Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

रामायणाशी संबंधित काही रहस्ये, ज्यांच्याबद्दल जग अजूनही आहे अनभिज्ञ!

1.प्रभु श्रीरामांना भगवान विष्णूचे अवतार मानले जाते. मात्र त्यांचे इतर बंधू जसे की लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे कोणाचे अवतार आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?

प्रभू रामचंद्रांच्या छोट्या भावास म्हणजेच लक्ष्मण ला शेषनागाचे अवतार मानले जाते जो शिरसागर मध्ये भगवान विष्णूंचे आसन आहे. तसेच भरत आणि शत्रुघ्न यांना भगवान विष्णु द्वारा हातामध्ये धारण केलेल्या सुदर्शन चक्र आणि शंखाचे अवतार मानले जाते.

2.असे मानले जाते की 14 वर्षांच्या वनवासात लक्ष्मण आपल्या भावाच्या आणि वहिनींच्या संरक्षणाच्या हेतूने कधीच झोपले नाहीत, म्हणून त्याला “गुडकेश” असेही म्हणतात.

Advertisement

वनवासच्या पहिल्या रात्री राम आणि सीता जेव्हा झोपतात तेव्हा निद्रा देवी लक्ष्मणासमोर प्रकट झाली, त्या वेळी लक्ष्मणाने निद्रा देवीला विनंती केली की त्याला असे वरदान द्या की तो 14 वर्षांच्या वनवासात झोपणार नाही आणि तो आपल्या प्रिय भावाचे आणि वहिनींचे रक्षण करू शकेल.

त्यावेळी निद्रादेवी लक्ष्मणाला म्हणाल्या तुमच्या ऐवजी कोणीतरी 14 वर्षे झोपले, तर तुम्हाला हे वरदान मिळू शकते. यानंतर, लक्ष्मणाच्या सल्ल्यानुसार, ही बातमी लक्ष्मणाची पत्नी आणि सीतेची बहीण, “उर्मिला” पर्यंत पोहोचली, उर्मिलाने लक्ष्मणाच्या बदल्यात निद्रा स्वीकारली. आणि संपूर्ण 14 वर्षे निद्रेत घालवली.

3.भगवान श्री रामाच्या वनवासात, जेव्हा लक्ष्मणाने लंकापती रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक कापले तेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले. मित्रांनो, एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही तीच शूर्पणखा होती जिने रावणाला त्याच्या उच्चाटनासाठी शाप दिला होता.

Advertisement

जेव्हा रावण महायुद्धावर होता, तेव्हा त्याला कल्केयाचा सामना करावा लागला. विद्युत्जीव हा कालकेयाचा सेनापती आणि शूर्पणखाचा पती होता.

ज्याचा रावणाने युद्धामध्ये वध केला होता मग, या वस्तुस्थितीमुळे दुःखी होऊन, शूर्पणखाने रावणाला स्वतःच्या मनात शाप दिला की एक दिवस रावण तिच्यामुळेच नष्ट होईल.

Advertisement
Leave a comment