पुणे – अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (karan singh grover) आणि त्याची पत्नी अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) लवकरच आई-वडील होणार आहे. बिपाशा (Bipasha Basu) आणि करणने (karan singh grover) सोशल मीडियावर ही माहिती देताच चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. विशेष म्हणजे करण आणि बिपाशा लग्नाच्या 6 वर्षानंतर आई-वडील होणार (Bipasha Basu Pregnant) आहेत. आई-वडील होण्याची आनंदाची बातमी जाहीर केल्यानंतर, लवकरच होणारे वडील करण सिंग ग्रोव्हर मुंबईतील सांताक्रूझच्या फूड हॉलबाहेर दिसले.

बिपाशाच्या आधी करण सिंग ग्रोव्हरने (karan singh grover) दोन लग्न केले होते. या दोन्ही लग्नांतून अभिनेत्याला मूलबाळ नाही. अशा परिस्थितीत करणचे हे पहिलेच अपत्य आहे.

करण आणि बिपाशाने त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करून पालक बनल्याची माहिती दिली आहे. या फोटोंमध्ये बिपाशा मोठा बेबी बंप फ्लॉंट (Bipasha Basu Pregnant) करताना दिसत आहे.

या घोषणेनंतर करण सिंग ग्रोव्हर (karan singh grover) मुंबईत स्पॉट झाला. यादरम्यान, अभिनेता त्याच्या हातात अनेक पॅकेट्स धरलेला दिसत होता.

करण सिंग ग्रोव्हर हातात गिफ्ट गुंडाळलेली अनेक पॅकेट्स धरलेला दिसला. त्यामुळे बिपाशा बसूचा (Bipasha Basu Pregnant) बेबी शॉवर सोहळा काही दिवसांत होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

ज्याच्या तयारीत कलाकार व्यस्त आहेत. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. करण सिंग ग्रोव्हर काळ्या जीन्ससह निळा शर्ट आणि कॅप आणि मास्क घातलेला कॅमेरात दिसला.

फोटोंमध्ये करणच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. करण सिंग ग्रोवरने बिपाशाच्या बेबी बंपला फ्लॉंट (Bipasha Basu Pregnant) करताना शेअर केलेले फोटो पाहता, अभिनेत्री सुमारे 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसते.

या दोघांनी ‘अलोन’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांची जवळीक वाढली. यानंतर एप्रिल 2016 मध्ये करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू यांनी एकमेकांशी लग्न केले.