साऊथ सुपरस्टार चिरंजीवी हा कोरोना पॉजिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी. असे चिरंजीवी याने ट्विट करून सांगितले आहे.

त्याचसोबत माझ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून, आता मी घरी विलगीकरणात आहे. असेही तो म्हणाला. चिरंजीवीच्या चाहत्याना ही बातमी समजल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे.

व चिरंजीवीचे अनेक चाहते सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीशी संबंधित सर्व मित्रही चिरंजीवीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Advertisement

चिरंजीवीची बातमी समजताच निर्माता श्रीनिवास कुमन यांनी चिरंजीवीसाठी लिहिले आहे की, ‘गेट वेल सून बॉस’, चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनीही चिरंजीवीसाठी म्हटले की ‘सर लवकर बरे व्हा.’

देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागला आहे. बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी कोरोनाचा सामना केला आहे.

कोरोनामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामळे काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Advertisement