नाशिक : पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP President) शरद पवार  (Sharad Pawar) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली (New Delhi) येथे एक बैठक झाली आहे.

राज्य सरकारच्या (State Government) दृष्टीकोणातून हा प्रकल्प महत्त्वांक्षी प्रकल्पांपैकी एक असल्याने त्याला गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांतून सेमी हायस्पीड रेल्वे (Semi high speed railway) जाणार आहे.

तसेच हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प एकूण २३५ किलोमीटर लांबीचा आहे. नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात हा मार्ग जाणार आहे.

Advertisement

या मार्गावर एकूण २४ स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत काटले जाणार असून, ही रेल्वे प्रतितास २०० किलोमीटर वेगाने धावणार आहे.

या रेल्वे मार्गासाठी नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील १ हजार ४७० हेक्टर जमीन खरेदी चालू आहे. परंतु रेल्वेच्या कामासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तसेच या कामासाठी जवळपास १५०० कोटींच्या निधींची गरज आहे.

या रेल्वे मार्गामागील वैशिष्ट्ये

Advertisement

२३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग

पुढे हा वेग २५० कि. मी. पर्यंत वाढविणार
पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प

पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी
१८ बोगदे, ४१ उड्डाण पूल, १२८ भूयारी मार्ग प्रस्तावित

Advertisement