पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या माध्यमातून या विद्यापीठाला सुंदर परिसर मिळेल. स्पोर्ट सायन्स, स्पोर्ट टेक्नॉलॉजी, स्पोर्ट कोचिंग अँड ट्रेनिंग याचे अभ्यासक्रम पहिल्या टप्प्यात सुरू केले जात आहेत.

400 कोटी रुपये या विद्यापीठासाठी मंजूर केलेले आहेत, या कामाला गती देण्याची भूमिका पाहता लवकरच स्पोर्ट युनिव्हर्सिटी चे स्वप्न पूर्ण होईल, यात काही शंका नाही असे मत राष्ट्रवाजी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवारांकडून विद्यापीठाच्या जागेची पाहणी

शनिवारी शरद पवार यांनी पुण्यातल्या बालेवाडी येथे जाऊन क्रीडा विद्यापीठाच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.

Advertisement

महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करायचा निर्णय घेतला, ही चांगली गोष्ट असून या माध्यमातून अनेक जुन्या खेळाडूंना संधी मिळेल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

जुन्या खेळाडूंना नव्या संधी

बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आयपीएल सुरू केले. या माध्यमातून जुन्या खेळाडूंना संधी मिळाली तसेच या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक संधी जुन्या खेळाडूंना नवे दालन उघडे होईल.

सीएसआरमधून क्रीडा विभागाला खेळाडूंना मदत कशी होईल, यासाठी क्रीडा मंत्र्यांनी उद्योग जगताशी बैठक घ्यावी, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेमागची भूमिका काय ?

राज्याची क्रीडाविषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्यासाठी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेणे.

क्रीडा विषयक नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात. तरुण वर्गाला क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे.

या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे. हा राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्यामागचा हेतू असल्याचं केदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Advertisement