पुणे: येत्या 15 फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. गेल्यावर्षी या ऑनलाइन परिक्षामध्ये विद्यार्थ्यांनी खूप गैरप्रकार केले आहेत. त्यामुळे यंदा प्रशासनापासून कडक नियमावली राबवण्यात येणार आहे.

या नियमावलीत परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे . एखादा विद्यार्थी परीक्षा देताना बोलताना आढळल्यास तसेच स्क्रीन सोडून बाहेर जात असेल तर त्याला परीक्षेतून बाद करण्यात येणार आहे. अशा प्रकारे परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने होतील असा विश्वास प्रशासनाला आहे.

तसेच कॉपी बहाद्दरांना बसणार चाप प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्याचा अनुभव विभागांना आहे. त्यामुळे विद्यार्थी नेमके कश्या प्रकारे गैरप्रकार करू शकतात, याची पुरेपूर कल्पना विभागांना आहे. त्यामुळे परिक्षेच्या दरम्यात याच गोष्टींवर विभाग लक्ष ठेवून असणार आहे.

Advertisement

यासाठी परीक्षेदरम्यानची व्यवस्था सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने प्रशासनाने दिली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक करावाई केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली आहे.