ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

महिला डाॅक्टरांच्या निवासस्थानी स्पाय कॅमेरे

महिलांच्या डाॅक्टराच्या निवासस्थानी छुपे कॅमेरे बसवून तिथले गुप्त चित्रीकरण केले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

भारती विद्यापीठात हा प्रकार घडला असून बाथरूम आणि बेडरूममध्ये लावलेल्या छुप्या कॅमे-याचा उपयोग कशासाठी केला जात होता, याचा आता पोलिस शोध घेत आहेत.

छुपे कॅमेरे जप्त

भारती विद्यापीठातील रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये स्पाय कॅमेरा लावल्याची घटना उघडकीस आली आहे. हा कॅमेरा बाथरुम आणि बेडरुममध्ये लावण्यात आला होता.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी लावण्यात आलेले छुपे स्पाय कॅमेरे पोलिसांनी जप्त केले आहेत.

असा आला प्रकार उघडकीस

३१ वर्षीय महिला डॉक्टर एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. ती रुग्णालयाच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये आणखी एका महिला डॉक्टरसह राहते.

ती मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम उरकल्यावर फ्रेश होण्यासाठी रुमवर आली होती. या वेळी तिने बाथरुमची लाईट लावली असता ती सुरू झाली नाही.

यानंतर बेडरुमची लाईटही सुरू झाली नाही. यामुळे तिने इलेक्ट्रीशनला बोलवले. त्याने दुरुस्ती करण्यासाठी बाथरुममधील बल्पचे होल्डर खोकल्यावर, आत स्पाय कॅमेरे, त्याचे मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला.

यानंतर बेडरुमच्या बल्पचे होल्डर खोलले असता तेथेही असाच प्रकार आढळून आला. यानंतर तिने तातडीने धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास करता सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे समजले तसेच रखवालदारानेही येथे दुसरे कोणी आले नसल्याचे सांगितले. पोलिस या प्रकरणी कसून तपास करत आहेत.

 

You might also like
2 li