पुणे : गेली काही महिने उलटले तरी एस.टी कर्मचाऱ्यांचा (S.T staff) संप सुरूच आहेच. विलीनीकरणाच्या (Merger) मुद्यावर ठाम राहून एस. टी कर्मचाऱ्यांचा संप (Strike) सुरूच आहे.

राज्य सरकारने (State Government) पगारवाढ करूनही एस.टी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. परिवहन मंत्री (Minister of Transport) अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचारी संघटनेने संपातून माघारी घेतल्याचे सांगत संप मिटल्याचे सांगितले होते.

पण तसे पाहता संप मिटल्याचे दिसत नाही. पुणे विभागातील (Pune Division) ८०० गाड्या अजून आगारात असून ३००० हजार कर्मचारी संपताच आहेत.

Advertisement

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अजय गुजर (Ajay Gujar) यांच्याशी चर्चा केली होती.

त्यानंतर अजय गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही संघटनेचे नेते किंवा संघटना संपात उतरले नाहीत. तर संपात प्रत्यक्षात कर्मचारीच उतरले आहे.

कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे परिवहन विभागाला (Department of Transportation) १ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. काही कर्मचारी (Staff) कामावर परतले आहेत. तर काही कर्मचारी संपात अजून सहभागी आहेत.

Advertisement

परिवहन विभागाकडून एस. टी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ आणि सेवासंपत्तीची कारवाई करण्यात येत आहे.