पुणे : एस टी कर्मचाऱ्यांचा (ST Staff) गेली काही दिवस संप (Strike) सुरु आहे. संपावर मात्र काही तोडगा निघताना दिसत नाही. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची आज बैठक झाली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आव्हान केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाण्याचेही आश्वासन पवार आणि अनिल परब यांनी दिले आहे. याच बैठकीवर वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी टीका केली आहे.
सदावर्ते म्हणाले की, आजची शरद पवार आणि अनिल परब (Anil Parab) यांची बैठक अत्यंत लाजीरवाणी होती. ज्या 67 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबाबत शरद पवारांनी ब्र देखील काढला नाही.
ते खरे आहे की बारामतीच्या कष्टकऱ्यांनी ठराव घेऊन, फ्लेक्स लावून जाहीर केले होते की कामगारांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी नाहीत. आणि ते पवारांनी आज कृतीत आणले.
शरद पवार हे एसटी महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर बोलावसं वाटले नाही. त्यामुळे ते कर्मचाऱ्यांच्या जीवाचा खेळ समजत आहेत.
यावर महाराष्ट्र प्रश्न विचारत राहणार, असा इशारा देखील सदावर्ते यांनी पवार आणि परबांना दिला आहे. त्याचबरोबर ‘आमच्याकडे एक पद्धत आहे की, आयोगाचे लोक जेलमध्ये विचारायला येतात की कुणाची काही तक्रार आहे का ?
तसे एका पाठोपाठ एक ज्या युनियनकडे माणसे नाहीत त्यांना संधी देण्यात आली. ते युनियनचे लोक आधी पवारांकडे पाहत होते आणि नंतर म्हणत होते कामगारांनी आता कामावर आले पाहिजे.
हा शरद पवारांचा वाढदिवस किंवा एखादी शोकसभा वाटत होती’, असा खोचक टोला सदावर्ते यांनी शरद पवारांना लगावला आहे.