Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

रखडलेली पोलिस भरती लवकरच

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली पोलिस भरती लवकरच होणार आहे. सप्टेंबरमध्ये ऑफलाईन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

आजवरच्या पोलिस भरतीत प्रारंभी मैदानी चाचणी होत असे; आता मात्र नव्या प्रणालीनुसार अगोदर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेतून पात्र होणा-या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

लेखी परीक्षेबाबतचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध

नोव्हेंबर 2019 मध्ये पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस दल व पोलिस वाहन चालक अशा 5200 पदांसाठी अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यानंतर महापोर्टल रद्द होणे, सरकार बदलले, कोरोना, आरक्षण या कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती.

Advertisement

आता पोलिस भरती लेखी परीक्षेबाबतचे शुद्धीपत्रक पोलिस खात्याकडून प्रसिद्धा करण्यात आल्याने राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणारे उमेदवार आता अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत.

मराठा उमेदवारांना विकल्प

पहिल्यांदा होणारी लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी एसईबीसी (मराठा उमेदवार) फॉर्म भरला होता. त्या उमेदवारांना खुला प्रवर्ग किंवा ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या मागास) यापैकी एक विकल्प निवडण्याची संधी दिली आहे.

हा विकल्प निवडण्याचा कालावधी 5 ते 15 ऑगस्ट असा 11 दिवसांचा असेल. ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र ही 2018-19 व 2019-20 या परीक्षांसाठी मार्च 2020 पर्यंतचे असणे आवश्यक केले आहे.

Advertisement

त्या दृष्टीने उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून येणाऱ्या भरतीला सामोरे जाता येईल. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये आयुक्तालये, ग्रामीण परिक्षेत्रे, एसआरपीचे ग्रुप व रेल्वे विभाग या सर्व युनिटमध्ये भरती प्रक्रिया पार आहे.

 

Advertisement
Leave a comment