महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर प्रशासक आल्यापासून ही बँक सातत्याने नफा कमवीत आहे. गेल्या आठ वर्षांपासून बँक प्रशासकीय मंडळाच्या ताब्यात आहे. सलग चाैथ्या वर्षी बँकेला नफा झाला आहे.

369 कोटींचा नफा

बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी आम्ही राज्यातील सहकारी बँकांचं पालकत्व स्वीकारलं असल्याचं सांगितलं. जनतेला आणि ठेवीदारांना बँकेच्या स्थितीविषयी, प्रगती विषयी माहिती देण्याचं कर्तव्य असल्याचं म्हटलं.

राज्य सहकारी बँकेला 369 कोटींचा निव्वळ नफा झाल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या आठ वर्षांपासून काम केलेल्या प्रशासक आणि कर्मचारी वर्गाचं यश असल्याचं ते म्हणाले.

Advertisement

राज्य सरकारकडून पाचशे कोटींचं येणं

राज्य सहकारी बँक रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले सर्व निकष पूर्ण केलेले आहे. बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 369 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्यावर्षी 325 कोटी नफा झाला होता.

त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं राज्य सरकारकडून 304 कोटी रुपये थकहमीपोटी मिळाले होते. यंदा बँकेला राज्य सरकारकडून 500 कोटी येणं आहे; पण कोरोनाच्या काळात बँकेला ते देण्यात आले नाहीत.

नफा 14 टक्क्यांनी वाढला

राज्य सहकारी बँकेने गेल्या काही काळात तोटा सहन केल्यानंतर बँक गेल्या चार वर्षांपासून नफा मिळवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Advertisement

बँकेचे एनपीए प्रमाण 1.2 टक्यांे वर गेले आहे, अशी माहिती अनास्कर यांनी सांगितलं. बँकेने राज्य सरकारला गेल्या आठ वर्षांपासून दहा कोटी लाभांश आणि सामाजिक बांधिलकी निधी म्हणून पाच कोटी रुपये देत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.