राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम!

पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचा महापौर होईल असा दावा करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली.

‘बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला, तरी गाय बैल होत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, असं टीकास्त्र शेलारांनी ठाकरे सरकारवर सोडलं.

राज्यात वसुलीचं काम सुरू

पोलिसांकडून राज्यात वसुलीचं काम सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की स्वबळ असे करतात, कोण दिल्लीला जातं, तर कोण बैठक घेत आहेत.

महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की 108 वेळा स्वबळाचा मंत्र जपत आहेत, असा टोला शेलारांनी लगावला

भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 हा

भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 हा धंदा महाविकास आघाडीने सुरू केला आहे. जनतेतून निवडून आलेल्या सदस्याचे अधिकार काढून घ्यायचे, असं म्हणत त्यांनी 12 आमदारांच्या निलंबनवार भाष्य केलं.

फोन टॅपिंगचे पुरावे द्या

फोन टॅपिंगचा कारभार हा केंद्र सरकारचा नाही. असेल तर पुरावा द्यावा, नाही तर गप्प बसा, अशी ताकीद आशिष शेलार यांनी विरोधकांना दिली.

ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाले असल्यास केंद्रावर गुन्हा दाखल करावा असं संजय राऊत म्हणाले. मात्र मुंबईतील रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा लागेल.

मुंबईत अनेक ठिकणी घटना घडल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असं शेलार म्हणाले.