Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

‘ड्रोन हल्ले टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा विकास हवा’

भारताच्या सीमेलगत भागांवर ड्रोनचा धोका वाढत असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यामुळे देशाच्या संरक्षणाचे प्रश्न निर्माण होत आहेत.

अशा धोक्यांना टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांच्या विकासावर भर द्यायला हवा, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.

अँटी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन म्हणाले, ‘‘ड्रोन्सचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहेत. त्यानुसार अतिघातक असलेल्या ड्रोन्सचा विनाश करण्यासाठी अँटी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. जे कमी घातक आहेत, ते मशिनगन आदींच्या साह्याने पाडावेत.

Advertisement

त्याचबरोबर अशा भागातील नागरिकांना ड्रोन्स ओळखणे शिकविण्याची गरज आहे. त्यांचा आवाज, दिसतात कसे, याचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे सैन्याला फायदा होईल. ड्रोन्सची लढाई दीर्घकाळ करावी लागले.

आपल्याकडे असलेल्या ड्रोन्सचा वापर पाकिस्तान विरुद्ध करता येईल. सर्जिकल स्ट्राईक हवाईदल ड्रोनच्या वापरातून केव्हा करेल, हे ही पाहावं लागेल. यातून पाकिस्तान आणि चीनला उत्तर देता येईल.’’

पाळत ठेवणारी प्रभावी यंत्रणा आवश्यक

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आज वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जात आहे. हे अत्यंत सहज उपलब्ध होणारे आणि वापरण्यास सोपे आहे. त्यामुळे ड्रोन्सच्या मदतीने दहशतवाद्यांकडून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केले जाऊ शकतो.

Advertisement

सध्या अफगाणिस्तानमधील घडामोडी पाहता याचा परिणाम काश्मीर आणि पंजाबसारख्या राज्यांवरही होऊ शकतो.

देशाच्या सुरक्षेसाठी अशा लोकांना ओळखण्यासाठी आपल्याकडे प्रभावी पाळत ठेवणारी यंत्रणा व त्याचबरोबर गुप्तचर विभाग व इतर विभागांशी समन्वयाची गरज आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र आर. निंभोरकर यांनी दिली.

लेझर गनसह ड्रोन विरोधी संरक्षण यंत्रणा विकसित करणे गरजेचे

ड्रोन हे दहशतवादी शस्त्र म्हणून अत्यंत कमी किमतीचा पर्याय आहे. कमी उंचीवरही उडण्यास सक्षम असल्याने त्यास शोधणे अवघड असते. आज ड्रोन हल्ल्यांचा धोका आहे.

Advertisement

देशाला ड्रोन धोरणाचा आढावा घेण्याची आणि संवेदनशील भागात ड्रोनच्या वापराला बंदी घालत, आणि लेझर गनसह ड्रोन विरोधी संरक्षण यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे.

 

Advertisement
Leave a comment