Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राज्यव्यापी ई-पीक पाहणी होणारः बाळासाहेब थोरात

येत्या काळात राज्यव्यापी ई-पीक पाहणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण पीकांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहे.

ई-पीक पाहणीसाठी टाटा टस्ट्रचे महत्वपूर्ण योगदान असणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

नवीन सातबा-याचे वितरण

महसूल दिनानिमित्त थोरात यांच्या हस्ते डिजिटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण करण्यात आले.

Advertisement

महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नवीन ऑनलाईन सुविधांचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात कळ दाबून करण्यात आला.

विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते उपस्थित होते.

बिनचूक सुविधा उपलब्ध

राज्यात आजपासून नागरिकांना नवीन स्वरुपात सातबारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे थोरात यांनी सांगितले.

Advertisement

ई-पीक पाहणी आता शेतकरीच नोंदवणार

राज्यात आता तलाठ्यांच्या ऐवजी प्रत्येक शेतकरीच ई-पीक पाहणीची नोंदणी करणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना सेवा सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. तसेच काही कायदे रद्दही करावे लागतात.

येणाऱ्या काळात विभागाच्यावतीने सातबारा सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे.

विभागाने अधिकचे चांगले काम करून नागरिकांना जलदगतीने उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

 

Leave a comment