मुंबई : दहावी (SSC) व बारावीचे (HSC) विद्यार्थी ऑफलाईन (Offline) परीक्षा विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. याबाबत बोर्डाकडून आज पत्रकार (Press Conference) परिषदेमध्ये या मुद्द्यावर स्पष्टीकरण देऊन परीक्षांबाबत (Student Exam) निर्णय घेतला जाणार आहे.

ऑफलाईन परीक्षाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती असून यासाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद ठिकाणी ऑनलाईन (Online) परीक्षा व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलने चालू आहेत.

बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय झालेला आहे, परंतु या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांची आक्रमकता पाहता पुन्हा या निर्णयात बदल घडू शकतो. त्यामुळे आज याबाबत बोर्ड कोणती घोषणा करेल याकडे सर्व विद्यार्थ्यांचे (Students) लक्ष लागले आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी परीक्षांबाबत आंदोलने (Exam Protest) झाली. यामध्ये अनेक विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या.

मुंबईत तर हिंदुस्थानी भाऊच्या (Hindustani Bhau) सांगण्यावरून हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री (Minister of Education) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घरासमोर आंदोलन केले आहे. याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला अटक (Arrest) देखील झाली आहे.

Advertisement