ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

करिअर अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह खासगी अभिमत विद्यापीठे, प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक), खासगी संस्थांनीही पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

नोकरीच्या अपेक्षेने त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या पुणे विद्यापीठात ९३ प्रकारचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू

पारंपारिक अभ्यासक्रमांचा उपयोग रोजगार मिळविण्यासाठी होतोच असे नाही. दिवसेंदिवस त्यांची रोजगार देण्याची क्षमताही कमी होत चालली आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठासह खासगी संस्थांनीही पदविका अभ्यासक्रम सुरू केल्याचे दिसते. ज्यातून विद्यार्थ्याला कौशल्याधारित शिक्षणाद्वारे थेट रोजगाराशी जोडता येते.

पदविका अभ्यासक्रमांची गरज

बहुतेक पदविका अभ्यासक्रम हे त्या विषयाची उद्योगांना असलेली गरज ओळखून विकसित केले आहेत.

शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते म्हणाले, ‘‘नियमितच्या अभ्यासक्रमांद्वारे उद्योगांना किंवा बाजारामध्ये अपेक्षित कौशल्य मिळेलच असे नाही. तसेच त्यांचा अभ्यासक्रम पाच वर्षांतून अद्ययावत केला जातो.

त्यामुळे तो काळानुरूप असेलच असे नाही. अशा वेळी पदवी, कौशल्य आणि अनुभव देणाऱ्या पदविका अभ्यासक्रमांची गरज आहे. विद्यापीठात असे अभ्यासक्रम उपलब्ध असून, त्याची गरजही जास्त आहे.’’

कौशल्यामुळे वाढते नोकरी मिळण्याची शक्यता

‘माझे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले असून, त्यात प्रत्यक्ष उद्योगांचा अनुभव मिळालाच असे नाही. पदविका अभ्यासक्रमामुळे अधिकची पदवी, तर मिळते त्याचबरोबर नवीन कौशल्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यताही वाढते.

तसेच त्यात पुढच्या हुद्द्यावरही काम करता येते. नोकरीच्या संधीसाठी असे पदविका अभ्यासक्रम केव्हाही चांगले.”असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

 

You might also like
2 li