पोलिसांनी मिसींग मोबाईलचा शोध घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. अशा सुमारे १४०० मोबाईलचा शोध घेतला जात असून त्यापैकी ७४ मोबाईल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट २ ला यश आले आहे.

मोबाईलची चोरी; परंतु मिसींगचा गुन्हा

बसस्टॉप, भाजी मंडई अशा गर्दीच्या ठिकाणाहून दररोज असंख्य मोबाईल चोरीला जातात. प्रत्यक्षात हे मोबाईल चोरीला गेलेले असले, तरी त्याची नोंद पोलिस गहाळ झाले म्हणून ऑनलाईन तक्रार करायला सांगतात. त्यातील अनेक मोबाईल पुणे शहरात ॲक्टीव्ह असल्याचे आढळून आले आहे.

बरेच मोबाईल पुण्यात ॲक्टिव्ह

पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलिस अंमलदार समीर पटेल यांनी परिमंडळ २ मधील सर्व पोलिस ठाण्यातील मिसींग तक्रारींचा आढावा घेतला.

Advertisement

त्यांची माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण केले. त्यात १३ लाख ४३ हजार ७०० रुपयांचे महागडे ७४ मोबाईल शोधण्यात यश मिळाले.

पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे, सहायक निरीक्षक वैशाली मोरे, सहायक फाैजदार यशवंत आंब्रे, अस्लम शेख, चेतन मोरे, चंद्रकात महाजन, उत्तम तारु, निखील जाधव, समीर पटेल, गजानन सोनुने, मितेश चोरमोले, कादीर शेख, गोपाळ मदने, अजित फरांदे, अरुणा शिंदे यांनी ही कामगिरी केली.

 

Advertisement