पुणे : शहरात (Pune City) एक धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षक (Female police inspector) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) करत जीवन संपवले आहे.

शिल्पा चव्हाण (Shilpa Chavan) असे महिला पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे शहरात आणि पोलीस दलात (Police force) खळबळ उडाली आहे.

शिल्पा चव्हाण या पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक (Crime Branch Police Inspector) पदावर काम करत होत्या.

Advertisement

सध्या त्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी (Department of Social Security in charge) म्हणून कार्यरत होत्या.

चव्हाण यांनी याअगोदर पोलीस दलातील विशेष शाखेत (Police Special Branch) काम बजावले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून जबाबदारी आली होती.

पोलीस दलातील पोलीस निरीक्षकानेच आत्महत्या केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुपारच्या दरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisement

शिल्पा चव्हाण यांनी कशामुळे आत्महत्या केली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.