पुणे : शहरातील कोंढवा (Kondhwa) परिसरात चोरीचा आरोप (Accused of theft) सहन न झाल्यामुळे एका १७ वर्षीय तरुणीने टोकाचे पाउल उचलत गळफास लावून आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे.

पायल बाबू चव्हाण (Payal Babu Chavan) (वय १७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मालकिनीने तरुणीवर चोरीचा आरोप होता. त्यामुळे तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

मोहम्मदवाडी (Mohammadwadi) येथील कृष्णानगरमध्ये (Krishnanagar)  आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी घर मालकिणीवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पल्लवी रितेश अग्रवाल (वय ४०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घर मालकिणीचे (House owner) नाव आहे. आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईने याविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पायल ही पल्लवी यांच्या घरी घरकाम करण्यासाठी जात होती. त्यावेळी पल्लवी हिने घरकाम करणाऱ्या पायलवर पर्स आणि चप्पल चोरीचा आरोप केला होता.

पल्लवी ही वारंवार मृत पायलला त्रास (Trouble) देत असायची. हाच त्रास सहन न झाल्याने पायलने आत्महत्या केली आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाबाबत अधिक तपास करत आहेत.

Advertisement