बेरोजगारी, आजारपण, आर्थिक विपन्नावस्था आदी कारणामुळं आत्महत्या केल्या जातात, असा समज आहे; परंतु उच्चशिक्षित, चांगली आर्थिक प्राप्ती असलेलेही आत्महत्येचा मार्ग अनुसरतात, तेव्हा भांबावून गेल्यासारखं होतं.

परदेशात शिकलेल्या आणि परदेशी कंपनीत काम करणा-या एका युवकानं आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मानसिक तणावातून आत्महत्या ?

परदेशातील एका नामांकित कंपनीमध्ये आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणाने बीएमसीसी रस्त्यावरील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Advertisement

अक्षय सुधीर देवधर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र त्यानं मानसिक तणावातून हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अक्षय हा चांगला गिर्यारोहकदेखील होता.

अक्षय मूळचा मुंबईचा

अक्षय हा मुळचा मुंबईचा राहणारा आहे. त्याचे आई-वडील मुंबईत राहतात. अक्षय याने इंग्लंड येथे शिक्षण घेतले आहे. तेथील एका नामांकित कंपनीत तो नोकरी करत होता; मात्र काही महिन्यापूर्वी तो पुण्यात आला होता.

डेक्कन येथील बीएमसीसी रस्ता परिसरातील रत्नाली अपार्टमेंटमध्ये त्याच्या आजोबांचा फ्लॅट आहे. त्यामध्ये तो एकटा राहत होता. तो घरुनच त्याच्या कंपनीचं काम करत होता.

Advertisement

 

 

 

Advertisement