Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

प्रियकराने लग्नाची टाळाटाळ केल्याने युवतीची आत्महत्या !

प्रियकराने लग्न करण्यास टाळाटाळ केल्याने आलेल्या नैराश्यातून एका युवतीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आला.

पूर्णा बशपंती चौधरी (वय २३, रा. चंदननगर) हे या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर कपिल मदन गोरे याच्यासह त्याचे कुटुंबीय आणि दोन मित्रांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पूर्णा हिच्या वडिलांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी कुटुंब मूळचे मध्यप्रदेश येथील आहे. पूर्णा ही खासगी कंपनीत नोकरीला होती.

Advertisement

कपिल व तिच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा साखरपुडा देखील झाला. त्यानंतर, कपिल लग्नाला टाळाटाळ करू लागला.

त्यामुळे ती नैराश्याच्या गर्तेत सापडली. तिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तिने याबाबतचा तपशील लिहून ठेवला होता.

Advertisement
Leave a comment