Home लाईफस्टाईल Superfood for hair Growth: केसांच्या जलद वाढीसाठी डाएटमध्ये करा ‘या’ सुपरफूडचा समावेश,...

Superfood for hair Growth: केसांच्या जलद वाढीसाठी डाएटमध्ये करा ‘या’ सुपरफूडचा समावेश, वेगाने वाढतील केस

0
17

Superfood for hair Growth: रोजच्या जीवनात लोक आरोग्याशी निगडित अनेक समस्यांचा सामना करत असतात. त्यातच आपण पाहतो बऱ्याच महिला व मुली केसांच्या समस्यांना तोंड देत असतात. खरतर प्रदूषण असो किंवा चुकीच्या खाण्यापिण्यामुळेही केस गळू लागतात किंवा त्यांची योग्य वाढ होत नाही.

अशात अनेकजण बाजारातील उत्पादने वापरण्यावर भर देतात. पण तुम्हाला माहीत केसांच्या चांगल्या वाढीसाठी किंवा निरोगी केसांसाठी तुम्ही केमिकलयुक्त उत्पादनांव्यतिरीक्त चांगला व सकस आहार घेणे देखील आवश्यक असते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टींच्या सेवनाने तुम्ही केसांना दाट, मजबूत व लवकर वाढवू शकता.

गाजराचे सेवन

गाजर आरोग्याबरोबरच केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. गाजरमध्ये भरपूर खनिजे आणि व्हिटॅमिन ए असते, जे स्कॅल्प आणि पेशींची वाढ वाढवण्याचे काम करते. याच्या वापराने केस चमकदार आणि निरोगी होतात.

मास्यांचे सेवन

माशांमध्ये बायोटिन आढळते, जे केस लांब आणि दाट बनवण्याचे काम करते. यासोबतच केसगळतीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. त्यामुळे माशांचा आहारात नक्कीच समावेश करा.

केसांसाठी अंडी

अंडी आरोग्याबरोबरच केस मजबूत करण्याचेही काम करतात. अंड्याच्या वापराने केसांची लवकर वाढ होते. त्याचबरोबर केसांना अंडी लावल्यानेही खूप फायदा होतो.

बदाम आणि अक्रोड

मजबूत केसांसाठी आहारात बदाम आणि अक्रोड सारख्या ड्रायफ्रुट्सचा नियमित समावेश करा. याच्या सेवनाने आरोग्य चांगले राहते, तसेच केसही मजबूत होतात आणि वेगाने वाढतात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here