पुणे – रविवारी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ‘भाजपा (bjp) हा आधी पक्ष होता आता भारतीय जनता लाँड्री झाला आहे’, असे विधान केले होते. त्या पुण्यात (Pune) बोलत होत्या. त्यांच्यात आणि आमच्यात अनेक वर्षांपासून वैचारिक मतभेद होते मात्र नात्यांमध्ये कटूता नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये त्यांचे खरे नेते नाहीत तर बाहेरच्या पक्षातून आलेले नेतेच अधिक आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या अनेक व्यासपीठावर तेच दिसतात. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षातून अनेक बडे नेते भारतीय जनता पक्षात गेलेअसं “. असं यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या होत्या.

दरम्यान, भारतीय जनता (bjp) पार्टीला “भारतीय जनता लाँड्री’ बोलल्यामुळे आता भाजप देखील आक्रमक झाले असून, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. “आपण मागे काय केलं, याचा विचार करूनच वक्तव्य करायला हवे’, असे ते म्हणाले.

“आपल्याला आठवत असेल तर २०१९ च्या निवडणुकीला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भ्रष्टाचाराचे पुस्तक छापली होती. भर सभेत त्यांनी ते पुस्तक दाखवले होते. आता दोघेही एकत्र आले आहेत. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा?

खरं तर राजकारणात अशी स्थित्यंतरं येत असतात, जो-तो आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत असतो. त्यामुळे आपण मागे काय केलं, याचा विचार करूनच वक्तव्य करायला हवे”, असे प्रत्युतर कपिल पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना दिले आहे.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी महागाई आणि बेरोजगारीवरून भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी इतर पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात घेण्यावरून टोला लगावला होता.