नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत (Rajyasabha) काँग्रेस (Congress) पक्ष व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशातच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदींवर पलटवार केल्यामुळे अमरावतीच्या खाजदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सूचक शब्दात त्यांची मनधारणा केली आहे.

याप्रकरणी नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचा (Maharashatra) अपमान होईल अशा शब्दाचा उल्लेख पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता.आणि तसे असते तर आम्ही लोकसभेत विरोध केला असता.

सुप्रियाताई माझ्यापेक्षा सिनियर आहेत. आणि मी त्यांचा आदर करते, पण त्यांनी मोदींच्या भाषणाचा उद्रेक करण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.

Advertisement

पुढे त्यांनी सांगितले की पंतप्रधानांना महाराष्ट्राचा सन्मान नसता तर पालखी मार्ग, समृद्धी महामार्ग ही कामे झाली नसती. महाराष्ट्राचा अपमान होईल असा शब्द पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता.

मोदींनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे कौतुक करणे योग्य आहे कारण, तसेच शरद पवार यांच्या कामाबाबत शंका नाही, जिथे राज्याचे मुख्यमंत्री घरात बसतात.

मात्र, दुसरीकडे या वयातही शरद पवार साहेब काम करतात, त्यांचे मोदींनी कौतुक केले ही कोणतीही चूक नाही, अशी कोपरखिळी त्यांनी महाविकासा आघाडीला (Mahavikas Aghadi) मारली आहे.

Advertisement