पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शाळा (School) सुरु करण्याबाबत मोठे विधान केले आहे तसेच त्यांनी शाळा सुरु करण्यासाठी नवीन उपायही सुचवला आहे.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यात (Pune) पत्रकारांशी (Journalist) संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. मी अनेक शाळा सुरू असलेल्या पाहिल्या आहेत. हिवरे बाजारमध्ये (Hiware Bajar school) शाळा सुरू होती.

नाशिकच्या (Nashik) एका शाळेची माहिती आली आहे. कोविडच्या (Covid) काळात शाळा सुरू आहेत. या निमित्ताने शाळा सुरू ठेवण्याचे काही मॉडेल्स समोर आले आहेत. कोविडच्या पहिल्या टप्प्यात आपण सर्वच पॅनिक होतो.

Advertisement

त्यामुळे शाळा बंद करणे योग्य होते. दुसऱ्या टप्प्यातही शाळा बंद ठेवल्या. तीही लाट वाईट होती. गेल्या दीड दोन वर्षात शाळा बंद (Close School) आहेत. त्यामुळे मुलांच्या शाळेत अडचणी आल्या आहेत.

एक फोन असेल तर घरात तीन तीन मुले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारला विनंती राहील की, सर्वांनी एकत्र येऊन सक्सेस स्टोरीचा विचार करावा.

शंभर टक्के शाळा सुरू होणार नाही हे मान्य आहे. पण ५० टक्के किंवा २५ टक्के वर्ग ब्रेक करावा, अल्टरनेट डेला शाळा सुरू करावी, असे काही तरी करून निर्णय घ्यावा असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

Advertisement

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना शाळांबाबतचे अधिकार द्यायला हवेत. ज्या शाळा सुरू आहेत.

त्या मॉडेलचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार करण्याबाबत तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले पाहिजे.

त्यामुळे मुलांना आणि पालकांना आधार होईल. गावातील शाळांना पटांगण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आत बसवू नका. त्यांना बाहेर बसवा. पण काही तरी मार्ग काढला पाहिजे.

Advertisement

टास्क फोर्सचे (Task Force) मार्गदर्शन घ्या. कोविडमध्ये शाळा चालवणाऱ्यांची माहिती घ्या, सक्सेस स्टोरीचा अभ्यास करून सुवर्णमध्य काढला पाहिजे, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले आहे.