पुणे – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. नुकतंच संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. एका महिला पत्रकाराने (Women Journalist) विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी ‘तू आधी कुंकू लाव, मग मी तुझाशी बोलतो’ असे वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या बुरसटलेल्या मनोवृत्तीच्या वक्तव्यावर राज्यभरातून प्रचंड टीका होत असून, अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही फेसबुकवर एक पोस्ट टाकून संभाजी भिडे यांना चांगलेच फटकारले आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या त्यांच्या फेसबुक पेजवर हेरंब कुलकर्णी यांची ‘तू आणि मी’ ही कविता शेअर केली आहे. या कवितेमधून स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या मनोवृत्तीवर निशाणा साधण्यात आला आहे. सध्या त्यांची ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

मात्र, सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) या कवितेवर आता संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे समर्थक किंवा स्वतः संभाजी भिडे कोणती प्रतिक्रिया देतात का?, हे पाहावे लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली दखल…

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या या व्यक्तव्याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली नाही म्हणून,

महिला पत्रकारांशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार तात्काळ सादर करावा, अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे.

संभाजी भिंडे काय म्हणाले होते…

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,”

यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं आहे.