पुणे – राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी कागदावर काहीतरी मजकूर लिहून दिला. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) हे बिचारे आहेत. यामागे मोठे षडयंत्र आहे, त्यामुळे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची खूप काळजी वाटते’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केले आहे. 

दरम्यान, पुणे महानगरपालिका समाज विकास विभागमार्फत महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमा वेळी सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय स्थितीवर भाष्य केले.  यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रॉम्पटींग करणे, चिठ्ठी देणे यासह त्यांना कमी दाखवण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.

सध्या अडचणीत आलेले शेतकरी, नागरिक यांच्यासाठी या सरकार ने कामे करावे. तसेच ‘ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी 105 आमदार असलेले मंत्री जातात’. असा टोलाही सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी भाजपला लगावला.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, दिपक केसरकर यांच्या बरोबर मी खूप वर्ष कामे केले आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांची चिंता आहे.

सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वतः गोंधळात आहे. सध्या राज्यात जे राजकारण जे चाललं आहे ते महाराष्ट्राला शोभत नाही. असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.