पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यामध्ये (Pune) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. त्यावर सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या ५ राज्यातल्या विधानसभा निवडणुकांपैकी (5 State Assembly Elections) ३ राज्यातील विधानसभा निवडणूका लढवणार आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली जात आहे.

Advertisement

देवेंद्र फडणवीसांनी बोलताना म्हंटल होत की, हे पाहा विरोधकांचे म्हटले तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, ”पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा”, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात.

कारण ती काही राष्ट्रीय पार्टी (National Party) नाही. त्यांचे काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही.

नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही असे म्हणत फडणवीसांनी टीका केली होती.

Advertisement

यालाच उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते फडणवीसांचे वैयक्तिक मत आहे आणि ते एक गोष्ट सांगायला विसरले, की त्यांच्याच केंद्र सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण दिले होते. ते माध्यमांना सांगायला ते विसरले असतील असा टोला सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना लगावला आहे.