पुणे – मुसळधार पावसाने सध्या पुणेकरांची (Pune Rains) झोपच उडवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात धुवाँधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. अनेक गाड्या पुराच्या पाण्यात अडकल्यात. काही गाड्या तर होडीप्रमाणे रस्त्यावरील पुराच्या पाण्यात हेलकावे खातानाही दिसल्या. सध्या पावसाची काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले आहे.

सोमवारी रात्री साडे अकरापर्यंत दीड तासात शिवाजीनगरात 104 मिमी पावसाची नोंद झाली. मगरपट्टा 111 मिमी आणि पाषाणमध्ये 94 मिमी पाऊस झाला. पुणे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी (Pune rain) घुसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पुणे- सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा (Traffic Problems) लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आणि याच वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना देखील बसला. सुप्रिया सुळे यांनी अखेर थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोसवल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते. आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते. असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

या ट्वीटसोबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. एक छोटा ट्रक बंद पडल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी स्वतः गाडीतून उतरून आजूबाजूच्या वाहनांना वाट करून दिली आणि ही वाहतूक कोंडी फोडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

तसेच, त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विट मध्ये केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी एक विनंती देखील केली आहे. “वाहतूक कोंडीचा नागरीकांना प्रचंड त्रास व मनस्ताप होत आहे.

तरी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री. नितीनजी गडकरी आपणास नम्र विनंती आहे की, हे काम तातडीने हाती घेऊन ते मार्गी लावणे आवश्यक आहे. कृपया याबाबत सकारात्मक विचार करावा”. या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.