मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राबद्दल संसदेत (Parliament) जे भाष्य केले त्याबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसवर (Congress)जे आरोप केले आहेत, त्यावर सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला आहे.

नरेंद्र मोदी यांनी संसदेत दीड तास भाषण केले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, काल संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दीड तासांचे भाषण होते. खूप अपेक्षने मी या भाषणाकडे पाहत होते.

सध्या आपला देश अडचणीतून चालला आहे. त्यामुळे राज्यांनी पुढे कसे मार्गक्रमण करावे याबाबत पंतप्रधानांनी दिशा द्यावी असे वाटत होते. आपण जीएसटीच्या एका टप्प्यावर आहोत, कोरोनाची तिसरी लाट ओसरते आहे.

Advertisement

नव्या नोकऱ्या निर्माण होत नाही. त्यामुळे एक स्टेट्समन म्हणून, पंतप्रधान म्हणून ते काही मार्गदर्शन करतील असे वाटत होते. पण “ते महाराष्ट्राबद्दल जे बोलले ती वेदनादायी गोष्ट आहे”.

मोदींच्या या विधानाने मला प्रचंड वेदना झाल्या. आपल्या महाराष्ट्राबद्दल (Maharashtra)मोदी असे का बोलत आहेत. आपल्या राज्याने भाजपला १८ खासदार दिले. मोदी पंतप्रधान आहेत त्यात महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे.

त्यांनी या मतदारांचा अपमान केला. कोविड स्प्रेडर म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला. ते केवळ भाजपचे (BJP) पंतप्रधान नाहीत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी असे विधान केले.

Advertisement

त्यामुळे दु:ख झाले. पंतप्रधानपद हे केवळ एखाद्या पक्षाचे पद नाही. ती संवैधानिक पोस्ट आहे. ते देशाचे आहेत. त्यामुळे त्यांचे विधान अधिक दु:खदायक होते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.