पुणे – बुधवारी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अवघ्या देशभरात धूमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav) निमित्ताने 10 दिवस मंगलमय होतात. आज घराघरांत आणि मंडळांमध्ये ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. आणि याच दरम्यान महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते नेतेमंडळींकडील गणेशोत्सवाला दिग्गजांची हजेरी लागताना दिसत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील अनेक राजकीय मंडळींच्या घरी गणपतींचं दर्शन घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, आता यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर हल्ला चढवला आहे. यावेळी त्या पुण्यात बोलत होत्या.

“साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात. अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत.

तसेच, गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात.

मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला ते कुणाच्या तरी घरीच दिसतात, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे (supriya sule) पुढे म्हणाल्या, “राज्यात कुठेही पालकमंत्री नाहीत. कोव्हिड असो किंवा नसो अजित पवार सकाळी 6 वाजल्यपासून काम करत असायचे.

त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. दर शुक्रवारी त्यांच्या मॅरेथॉन मिटिंग व्हायच्या. आता पालकमंत्रीच नाहीत. त्यामुळे कामेही होताना दिसत नाहीत’.