ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

दोन्ही मूत्रपिंडांमध्ये कर्करोग असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया

एकाच वेळेस दोन्ही मूत्रपिंडांमधील कर्करोग काढण्याच्या दुर्मिळ व अत्यंत अवघड शस्त्रक्रियेमुळे ५६ वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले आहे.

शस्त्रक्रियेद्वारे डाव्या मूत्रपिंडातून २.७ किलो वजनाचा ट्युमर तर उजव्या मूत्रपिंडात सुमारे २५० ग्रॅमचा ट्युमर होता. याविषयी माहिती देताना वरिष्ठ मूत्रपिंडतज्ज्ञ आणि एस हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले की, नाशिकमधील या ५६ वर्षीय महिलेला दोन्ही मूत्रपिंडांमध्ये कर्करोग निदान झाल्यानंतर दोन्ही मूत्रपिंड काढण्याचा व कायमचे डायलिसिस करण्याचा सल्ला दिला होता.

त्यांच्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांना तिस‍ऱ्या टप्प्यातील ट्युमर झाला होता, ज्यामध्ये संपूर्ण डावे मूत्रपिंड आणि उजवीकडील मूत्रपिंडाचा अध्र्याहून अधिक भाग यांचा समावेश होता. लोकांमध्ये एकाच वेळेस दोन्ही मूत्रपिंडांमध्ये कर्करोगाचा ट्युमर असण्याची शक्यता खूपच कमी असते.

एकूण मूत्रपिंड कर्करोगांपैकी याचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या आहेत, असेही ते म्हणाले.

डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया यशस्वी करणा‍ऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. सुपर्ण खळदकर व डॉ. गुरुराज पडसलगी यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. नेहा बनवट आणि शस्त्रक्रिया विभागातील उषा बावधने, सुनीता कांबळे, राहुल आबुज, राहुल साबळे, सविता पोखरे आणि गंगाराम सलाब यांचा समावेश होता.

You might also like
2 li