file photo

पुणे : पुणेकरांना वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे; परंतु प्रस्ताव मान्यतेसाठी महापालिका आणि मेट्रोत मानापमान नाट्य सुरूच असून स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या मेट्रोच्या मान्यतेचा विषय पुन्हा लांबणीवर पडला आहे.

मेट्रोचे अधिकारी अनुपस्थित

स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गाने नेण्यात येणाऱ्या मेट्रोच्या मान्यतेचा प्रस्ताव, आजच्या सर्वसाधारण सभेत मान्य न होता तो आठ दिवसाने पुढे घेण्यात आला.

मेट्रोबाबत कुठल्याही मान्यतेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आणताना, मेट्रोचे अधिकारी सभागृहात आले पाहिजेत, अशी मागणी पहिल्यापासूनच सदस्यांनी केली होती,

Advertisement

तरीही आज स्वारगेट ते काजत्र मेट्रोच्या वाढीच खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव पटलावर मांडण्यात आला; मात्र याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सभासदांनी विरोध केला.

भाजपची कोंडी

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती नको, मेट्रोचे अधिकारी सभागृहात का बोलविले नाही. असा मुद्दा उपस्थित करीत, प्रथम या भुयारी मार्गाची आम्हाला माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी मागणी लावून धरली.

अखेरीस सदर प्रस्तावाला मान्यता मिळावी म्हणून अर्ध्या तासाहून अधिक प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी भाजपला हा प्रस्ताव आठ दिवस पुढे घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

Advertisement