पुणे : शहरातील  हाय स्ट्रीट (High street) जवळील पाठशाळा (School) परिसरातून ४ वर्षाच्या स्वर्णवचे (4 year old boy) अपहरण (Abduction) करण्यात आले होते. तेव्हापासून स्वर्णवचा (Swarnav) शोध सुरु होता.

11 जानेवारीला स्वर्णवचे अपहरण करण्यात आले होते. अखेर या मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchawad) परिसरातील पुनावळे परिसरात हा चिमुरडा पोलिसांना सापडला आहे.

स्वर्णवचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांच्या (Pune Police)  शोधकाऱ्याला अखेर यश आले आहे. 300 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकांनी स्वर्णवचा शोध घेतला आहे.

Advertisement

गेले आठ दिवस स्वर्णवचा शोध सुरु होता. सोशल मीडियावर स्वर्णवचे फोटो टाकण्यात आले होते आणि त्याच्याबद्दल माहिती देण्यात आली होती. अखेर स्वर्णवचा शोध लागला आहे. पुणे पोलिसांनी स्वर्णवला त्याच्या आईवडिलांकडे सोपवले आहे.

भाजपचे (BJP MLA) आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी अपहरणकर्त्याचे फोटो (Photo) सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत काही माहिती मिळाल्यास ती शेअर करण्याची विनंती केली होती.

पोलिसांना स्वर्णवचा शोध लागला असला तरी आरोपीचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही. त्यामुळे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अपहरण का आणि कशासाठी केले होते याचा शोध पोलीस करत आहेत.

Advertisement