पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवडवासीयांची (Pimpri Chinchwad) तहान (water) भागविणाऱ्या पवना धरणात केवळ 17.79 टक्के पाणीसाठा (water) आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा, सद्यस्थितील पर्जन्यमान याबाबी विचारात घेऊन महापालिकेने दैनंदिन पाणीवापर (water) अत्यंत काटकसरीने करावा. दैनंदिन पाणीवापर असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर गेल्यास तीव्र पाणीटंचाई (water) निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला केली आहे.

त्यामुळे मागील अडीच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांना आता दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता रा.वि.सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र पाठविले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी कपात करण्याची सूचना केली आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात सध्या 540 एमएलडी पाणीपुरवठा होतो. हे पाणी शहरातील अर्ध्या भागात एक दिवस आणि उर्वरित भागात दुसऱ्या दिवशी पुरविले जाते.

पाणी उपसा करण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पवना धरण परिसरात जून महिन्यात पाऊस पडत असतो.

ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात धरण शंभर टक्के भरत असते. यावर्षी पावसाने ओढ दिली आहे. जून संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची (Pimpri Chinchwad) चिंता वाढली आहे.