एअर इंडियाने टाटा समूहाकडे मालकी सोपवल्यानंतर टाटा समूह यापुढे एअर इंडियाची विमानसेवा सांभाळणार आहेत. यासाठी ते पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगत आहेत.

टाटा समुहाकडून संचलित होणाऱ्या विमान सेवेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून अधिकाऱ्यांनी यातील कर्मचाऱ्यांना त्याबाबतची कल्पना दिली आहे.

अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार गुरुवारपासून टाटा समूह मुंबईहून उड्डाण घेणाऱ्या चार विमानांमध्ये जेवणाची सेवा पुरवणार आहे.

Advertisement

अशा प्रकारे टाटा समूह एअर इंडियामध्ये आपल्या सेवेची सुरुवात करणार आहे. मात्र, एअर इंडियाची उड्डाणे ही टाटा समुहाच्या नावाखाली होणार नाहीत.

यामध्ये औपचारिक कागदपत्रांची प्रक्रिया एअर इंडिया लवकरच पूर्ण करणार आहे. यातूनच एअर इंडिया कंपनीचा ताबा टाटा समूह आज घेणार आहे.

केंद्र सरकारने तोट्यात असणाऱ्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एअर इंडियासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.

Advertisement

केंद्र सरकारने निविदा प्रक्रियेनंतर 8 ऑक्टोबर 2021 रोजी 18 हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाच्या ‘टॅलेस प्राइव्हेट लिमिटेड कंपनी’ला एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली असून गुरुवारपासून टाटा समूह एअर इंडियामध्ये आपली सेवा सुरू करणार आहे.

यात टाटा समुहाकडे तीन एअरलाइन्स कंपन्या असून विस्तारा आणि एअर एशिया या विमान कंपन्या आहेत.

Advertisement