मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, या राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेला (shivsena) वाचवण्याच्या प्रयत्नात मैदान उतरले आहे.

तर, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठा यात्रेच्या माध्यमांतून विस्कटलेल्या पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या आदित्य ठाकरे हे मुंबईत ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांना भेटत आहेत. या निष्ठा यात्रेत ते शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चालेल्या या संघर्षात आता उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेजस ठाकरे (tejas thackeray) यांची राजकारणात एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

लवकरच तेजस ठाकरे (tejas thackeray) महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होताना दिसून येतील असा विश्वास शिवसेना नेत्यांकडून वर्तविला जात होता.

मात्र, आज अखेर उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे (tejas thackeray) हे राजकीय मैदानात उतरण्यासाठी सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी करा अथवा मरा अशी स्थिती आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी ठाकरेंनी केली आहे.

मुंबईतील दहीहंडी (Dahihandi) उत्सवानिमित्त तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचं राजकीय लाँचिंग करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

यामुळेच मुंबईतील गिरगाव येथील दहीहंडी कार्यक्रमाकरिता शिवसेनेतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर तेजस ठाकरे यांचेही फोटो झळकत आहेत.

यावर ‘युवा नेतृत्व’ आदित्य ठाकरे तर ‘युवा शक्ती’ म्हणून तेजस ठाकरे यांचे पोस्टर्स गिरगावात लावण्यात आले आहे. दरम्यान, शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचे ढासळलेला बुरूज पुन्हा उभारण्यासाठी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते मुंबईसह राज्यभरात शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत.

या सर्व प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात कधी उतरतात याकडे मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र, आता त्याची देखील पूर्ण तयारी ठाकरेंनी केली असल्याचं पाहायला मिळत आहे.