सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने ताब्यात घेतली. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका होत आहे.

जरंडेश्वर कारखाना पवार यांच्या मामाचा आहे. त्यावर पवार यांनी आज भाष्य करताना जरंडेश्वरमध्ये घोटाळा काय आहे, तर सांगा, असे आव्हान दिले.

उभारणीपासून अडचणीत

जरंडेश्वर कारखान्याच्या उभारणीपासून आतापर्यंत विविध कारणांनी हा कारखाना अडचणीत आला. पश्चिम महाराष्ट्रात दोन उपाध्यक्ष हा एकमेव सहकारी साखर कारखाना ठरला.

Advertisement

दरम्यान या कारवाईला पवार यांनी दुजोरा दिला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या चिमणगाव परिसरातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली.

चाैकशी पारदर्शक हवी

ते म्हणाले, की कारखान्यावर ईडीने टाच आणली, ही बातमी खरी आहे. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याआधीही चौकशी करण्यात आली; मात्र साध्य काहीच झालं नाही. चौकशी पारदर्शकपणे व्हावी.

राज्य सहकारी बँकेत घोटाळा असता, तर नफ्यात आली नसती असेही पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी जरंडेश्वर साखर कारखाना प्रक्रियेमध्ये सर्व कायदेशीर प्रक्रियेचं पालन झाल्याचा दावा केला.

Advertisement

कायदेशीर प्रक्रिया करून कारखाना घेतला चालवायला

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. कर्ज थकवणाऱ्या कारखान्यांची विक्री करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानेच दिला होता. जरंडेश्वर कारखाना विकत घेण्यासाठी १५ एक कंपन्यांनी आपापले टेंडर भरले होते.

गुरू कमोडिटी कंपनीने सर्वांत जास्त बोली लावली होती. पहिल्या वर्षात बीव्हीज कंपनीने कारखाना चालवायला घेतला; मात्र कंपनीला मोठं नुकसान झालं. त्यानंतर माझ्या नातेवाइकांनी तो कारखाना चालवायला घेतला.

पूर्वीही ईडीकडून चाैकशी?

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारखाना विकला. कारखाना संचालक मंडळानं विकलेला नाही. जरंडेश्वर कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिक किमतीला विकला गेला.

Advertisement

कारखाने विकत घेणाऱ्यांमध्ये भाजप, काँग्रेस नेत्यांचाही समावेश सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या याआधी वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी माझी चौकशी केली आहे; पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही.

 

Advertisement