ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

आंबील ओढ्यातील नागरिकांचे स्थलांतर तात्पुरतेः गोऱ्हे

आंबील ओढयातल्या नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर होणार आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

अधिका-यांसोबत पाहणी

गोऱ्हे यांनी आज महापालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत आंबील ओढ्यची पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आंबील ओढ्यामध्ये झालेल्या अतिक्रमण कारवाईला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. आक्रमक झालेल्या नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन केले होते.

कामाचे सादरीकरण

या प्रकरणावरून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अनेक नेत्यांनी या घटनास्थळाला भेट देत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले होते.

या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासून सक्रिय असणाऱ्या डाॅ. गोऱ्हे यांनी आज अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण आंबील ओढयाची पाहणी केली. या वेळी इथे होणाऱ्या कामाबाबत सादरीकरण देखील करण्यात आले.

जागा पसंत नसल्यास स्थलांतर

यानंतर डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या,” आंबील ओढ्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांचे कायमचे स्थलांतर होणार नाही. फार तर तात्पुरते स्थलांतर होईल.

आत्ता जिथे कारवाई झाली, घरे पाडण्यात आली, ती जागा पसंत नसेल तर दुसरीकडे स्थलांतर करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनीदेखील याची दखल घेतली होती; मात्र मार्ग काढण्याआधीच कारवाई झाली.”

 

You might also like
2 li