पुणे : दक्षिण आफ्रिकेनंतर (South Africa) भारतातही (India) कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएन्टने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. देशात ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत (Number of patients) झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चिंता वाढवणारी बाब म्हणजे महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी राज्यात ३१ रुग्ण (New Cases) सापडल्याची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या ही १४१ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे राज्याचे टेन्शन आणखीनच वाढले आहे. तर ६१ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.

Advertisement

मुंबई (Mumbai) मध्ये सर्वाधिक रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात दिवसभरात जे ३१ रुग्ण सापडले आहेत त्यातील २७ रुग्ण हे एकट्या मुंबई मधील आहेत. त्यामुळे मुबईकरांची चिंता वाढली आहे.

मुंबईतील कोरोना (Covid-19) रुग्णाच्या संख्येतही वाढ होत आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल ९२२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचे एकूण ४२९५ सक्रिय रुग्ण आहेत.

पुण्यातही (Pune) ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) खबरदारी म्हणून येत आहेत. तर नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हानही करण्यात येत आहे.

Advertisement