पुण्यातील शाळांमध्ये दहावीच्या गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठराविक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

गर्दी न करता गुणपत्रिकांचे वाटप

विभागीय मंडळाकडून शाळांना 7 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जातील. त्यानंतर शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शासनाच्या नियमांचे पालन करून गुणपत्रिका द्याव्यात, असे सांगण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशासाठी सीईटी

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. यामध्ये राज्यातील 99. 95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

Advertisement

मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के इतका आहे. आता अकरावीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.

कोरोना रुग्ण आढळल्याने शाळा पुन्हा बंद

वाशीम जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते; मात्र काही शाळांमध्ये पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

वाशीम जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांतील 81 शाळा सुरू करण्यात आल्या असून, यात मानोरा तालुक्यात शेंदुरजना येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ही शाळा शिक्षण विभागाने पुन्हा बंद केली आहे.

Advertisement

घरबसल्या देता येणार परीक्षा

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीच्या ऑनलाइन शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेने इन्फोसिस कंपनीच्या सहकार्याने नवे ई-लर्निंग ॲप विकसित करण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देणे शक्य होणार आहे. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठवडाभरात ते कार्यान्वित होईल.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबतच्या संशोधनांचा अभ्यास करून स्वतः या ॲपची रचना केली.

Advertisement

या ॲपमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारने वर्गनिहाय उपलब्ध करून दिलेला आणि जिल्हा परिषदेने तयार केलेला अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध होईल.

त्यामुळे कोरोनाकाळात शिक्षणापासून दुरावण्याची शक्यता असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Advertisement