ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ४ जणांचा अपघातात दुःखद मृत्यू

माहितीनुसार इंदापूर शहराजवळ अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. इंदापूर शहराजवळ बोलेरो आणि आर्टिगा गाड्यांचा अपघात झाला आहे.

हा अपघात एवढा भयंकर होता की जागेवर ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही गाड्या भरधाव वेगात असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघात एवढा भयानक होता की गाडीमधील तिघा जणांचा जागेवर मृत्यू झाला आहे. त्यातील एक जणाची ओळख पटली नसून तिघांची ओळख पटली आहे.

तिघेही पंढरपूरचे असल्याचे सांगण्यात आले आहे. एक जण त्यातील गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिकांनी अपघात झाल्यावर त्यासंदर्भातील माहिती इंदापूर पोलिसांना दिली.

त्यांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थिती लावली. घटनास्थळावरून चार जणांचे मृतदेह ताब्यात घेणार आल्याचे सांगण्यात आले आहे. खरंतर, राज्यात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रस्ते ओले झाले आहेत.

अशात महामार्गावर वाहनं हळू चालवा अशा कितीही पाट्या लावल्या तरी गाड्यांचा वेग काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे असे अपघात वारंवार होतात आणि नाहक बळी जातो. त्यामुळे रस्त्यांवर वाहन हळू चालवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

You might also like
2 li