Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पुणे जिल्ह्यात भयानक हत्याकांड ! तलवारीने सपासप वार करत दगडाने तोंडाचा चेंदामेंदा.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे दोन युवकांचे भीषण हत्याकांड घडलय.खुनाच्या घटनेने पाटस गाव सुन्न झालय. तलवारीने सपासप वार करून डोक्यात दगड घालून दोन तरुणांची हत्या.करण्यात आलीए. दौंड तालुक्यातील पाटसच्या तामखडा येथील भयानक घटना आहे.

फोनवरून शिवी गाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांची काठ्या तलवारी आणि डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आली आहे.दौंड तालुक्यातील पाटस येथील तामखडा भानोबा मंदिरासमोर ही रविवारच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपी पसार झाले आहेत या घटनेमुळे रात्रीपासूनच पाटस परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवम संतोष शीतल वय वर्षे 23 गणेश रमेश मानकर वय वर्षे 23 हे अशी खुन झालेल्या दोघांची नाव आहेत.याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत महेश टुले योगेश शिंदे व इतर चार ते पाच अनोळखी इसम अशी आरोपींची नावे असून ते फरार आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शिवम शितल आणि गणेश माकर यांना मन्या उर्फ महेश संजय भागवत यांच्यासोबत फोनवरून आई आणि बहिणी वर विनाकारण शिव्या दिल्या शिव्या का दिले याचा जाब विचारायला गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या व तलवारी आणि डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या केली

याबाबत अर्जुन संभाजी माखर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे घटनास्थळी दाखल झाले असून या दरम्यान रात्रीपासूनच या ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत .

Leave a comment