पुणे : परीक्षा परिषदेचे आयुक्त (Commissioner of Examination Council) ​तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी परीक्षा पेपरफुटी (TET Exam Scam) प्रकरणात अटक (Arrest) करण्यात आली आहे. सुपे यांच्याकडे आज पुन्हा एकदा ५ लाख रुपये सापडले आहेत.

शुक्रवारी केलेल्या छापेमारीत पोलिसांना ३३ लाख रुपये सापडले होते. सुपे यांनी हे पैसे २०१८ ते २०१९ च्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारातून कमवले आहेत. सुपे यांची जसजशी चौकशी होत आहे.

तसतशी माहिती समोर येत आहे. तुकाराम सुपेची शिक्षण विभागातील (Department of Education) ​कारकीर्द आधीपासूनच वादग्रस्त राहिली आहे.

Advertisement

आतापर्यंत तुकाराम सुपेकडून पुणे पोलिसांनी (Pune Police) ३ कोटी ९३ लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या प्रकरणाची चौकशी CBI कडे देण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण अधिकाऱ्यांपर्यंत मायादित नसून तो मंत्रालयापर्यंत पोहचलेला असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.

मात्र महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाची योग्य पद्धतीने तपास करत आहेत त्यामुळे सीबीआयची गरज नसल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement