पुणे : म्हाडा पेपरफुटीनंतर टीईटी (MahaTET) परीक्षेतही मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना (Tukaram Supe) अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber Police) याबाबत चौकशी सुरु आहे.

तुकाराम सुपे यांच्याकडील रोकड काय संपायची दिसत नाही. सायबर पोलिसांना (Cyber Police) पुन्हा एकदा सुपे यांच्याकडे १० लाखांची (10 lakhs) रोकड सापडली आहे. ही रोकड त्यांनी जवळच्या व्यक्तीकडे ठेवायला दिली होती.

सुपे यांच्या त्या जवळच्याच व्यक्तीने ती १० लाखांची रोकड पोलिसांकडे जमा केली आहे.अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनच्या डीसीपी भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांनी दिली आहे.

Advertisement

तुकाराम सुपे यांच्याकडून आतापर्यंत 2 कोटी 57 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सुपे यांच्या घरावर पहिल्यांदा धड टाकली तेव्हा ९० लाख रुपयांचे घबाड सापडले होते.

दुसऱ्या धाडीत पोलिसांना 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने सापडले होते. ही रोकड आणि सोने तुकाराम सुपे यांनी मेव्हण्याकडे ठेवायला दिली होती.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता सुपे यांनी त्याची कबुली दिली होती. आणि आटा सुपेंच्या जवळच्या व्यक्तीकडून १० लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

Advertisement