पुणे : परीक्षा परिषदेचे आयुक्त (Commissioner of Examination Council) ​तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी परीक्षा पेपरफुटी (TET Exam Scam) प्रकरणात अटक (Arrest) करण्यात आली आहे.

तुकाराम सुपेंचे वकील मिलिंद पवार (Milinnd Pawar) यांनी सनीतले की, TET परीक्षा घोटाळ्याप्रकरणी मला बळीचा बकरा बनवले जात आहे. मला जाणूनबुजून टार्गेट केले जात असून या सगळ्याचा मनःस्ताप होत आहे.

त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय, असा इशारा तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांनी दिला आहे. तुकाराम सुपे हा टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त असून हा घोटाळा उघड झाल्यापासून तो तणावात असल्याची माहिती मिलिंद पवार यांनी दिली आहे.

Advertisement

आतापर्यंत तुकाराम सुपेकडून पुणे पोलिसांनी (Pune Police) ३ कोटी ९३ लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. जसजशी चौकशी होत आहे तसतसे पैसे सापडत आहेत.

सुपे यांनी त्यांच्या जवळील व्यक्तीकडेही काही पैसे ठेवायला दिले होते, त्या व्यक्तीने पोलिसांकडे ते पैसे सुपूर्द केले आहेत. तुकाराम सुपे यांनी हे पैसे २०१८ ते २०१९ च्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारातून कमवले असल्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे.

Advertisement