पुणे : परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी परीक्षा पेपरफुटी (TET Exam Scam) प्रकरणात अटक (Arrest) करण्यात आली आहे. सुपे यांच्याकडे आज पुन्हा एकदा ३३ लाख रुपये सापडले आहेत.

तुकाराम सुपे यांच्याकडे कालसुद्धा १० लाख रुपये सापडले होते. ही रोकड सुपे यांच्या जवळच्या व्यक्तीने पोलिसांकडे आणून दिली आहे.

आतापर्यंत तुकाराम सुपेकडून पुणे पोलिसांनी (Pune Police) ३ कोटी ८८ लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत.

Advertisement

सुपे यांनी हे पैसे २०१८ ते २०१९ च्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारातून कमवले आहेत. सुपे यांची जसजशी चौकशी होत आहे. तसतशी माहिती समोर येत आहे. तुकाराम सुपेची शिक्षण विभागातील (Department of Education) ​कारकीर्द आधीपासूनच वादग्रस्त राहिली आहे.

तुकाराम सुपे यांच्या घरातून पोलिसांनी घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. तर पहिल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचे घबाड जप्त केले होते.

पण पुन्हा पोलिसांचा (Police) छापा पडण्याच्या भीतीने सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्याने रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले होते. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागले होते.

Advertisement

शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे. म्हाडा (MHADA Paper Leak) पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.