पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या या दौऱ्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सच्या या अमेरिकेतील वृत्तपत्राचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला होता.

‘पृथ्वीवरील शेवटची सर्वात मोठी आशा’ या मथळ्याखाली पंतप्रधान मोदींचा फोटो होता. या स्क्रिनशॉटवर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने स्पष्टीकरण दिले आहे.

सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. न्यूयॉर्क टाइम्सने या व्हायरल होणाऱ्या स्क्रिनशॉटवर ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

Advertisement

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्रासह व्हायरल करण्यात येणारा वृत्तपत्राच्या बातमीचा स्क्रीनशॉट हा पूर्णपणे खोटा आहे.

फोटोशॉप करण्यात आलेला फोटो शेअर करणे आणि वेगवेगळ्या ग्रुपवर व्हायरल करणे म्हणजे खोटी माहिती आणि भ्रम निर्माण करण्यासारखा आहे.

सत्यावर आधारित पत्रकारितेची आवश्यकता असताना अशावेळी ही महत्त्वाची गोष्ट आहे. या ट्विटमध्ये न्यूयॉर्क टाइम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडित असलेल्या बातमीची लिंक ही दिली आहे.

Advertisement