आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल भाव तीन वर्षांच्या विक्रमी तेजीवर पोहोचले आहे. याची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर पार पोहोचली आहे. याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये हा ७८.२४ डॉलरवर होता.

अमेरिकी कच्चे तेल डब्ल्यूटीआयही १.१% महाग होऊन ७४.८० डॉलर प्रति बॅरल झाले. दोन्ही इंधनांत सलग पाचव्या दिवशी उसळी दिसली.

केंद्र व राज्य सरकारांनी कर कपात केली नाही तर भारतात आगामी दिवसांत पेट्रोल-डिझेलचे ३ रुपयांपर्यंत महाग होऊ शकते.

Advertisement

एक महिन्याआधी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरल हाेते. म्हणजे, एका महिन्यात यात १४.३% ची वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीत हे प्रति बॅरल ५१ डॉलर होते. या हिशेबाने या वर्षी याच्या दरात ५६.९% ची वाढ झाली.

उत्पादनात वाढ न झाल्यास कच्च्या तेलाचे दर वाढतील. यंदा दर ९० डॉलर प्रतिबॅरलवर जाऊ शकतात. दुसरीकडे, ब्रिटिश पेट्रोलियम सिंगापूरचे अध्यक्ष यूजीन लेओंग म्हणाले, २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीत जागतिक तेलाचा वापर कोरोनापूर्वीच्या पातळीवर येऊ शकते.

Advertisement