पुणे शहरातील पाच विविध ठिकाणाहून 16 ते 18 जून कालावधीत अवघ्या तीन दिवसांत तब्बल पाच मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

कात्रज, कर्वेनगर, येरवडा, लोणीकंद, हडपसर परिसरातील अल्पवयीन मुलींना वेगवेगळी आमिष दाखवून अपहरणकर्त्यांनी पळवून नेले आहे. संबंधित मुलींच्या पालकांनी हद्दीतील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

कात्रजमधील १० वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेण्यात आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यत तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

कर्वेनगर परिसरातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पीडितेच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्याशिवाय येरवड्यातील गांधीनगर परिसरातून अज्ञाताने १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.

Advertisement

हडपसर परिसरातून १७ वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. दरम्यान, अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेतला जात आहे.